खाद्य तेलाचे पॅकिंग येणार आता ठराविक आकारातच
मुंबई
खाद्यतेल कंपन्यांकडून पॅकिंगच्या आकारात (पॅक साईझ) होणारी हेराफेरी रोखण्यासाठी केंद्र सरकार आता नवीन नियम आणण्याच्या तयारीत आहे. बाजारात सध्या ८५० मिली, ८७५ मिली, ९०० मिली आणि ९५० मिली अशा वेगवेगळ्या आकारांत खाद्य तेल विकले जाते. यामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या ब्रँड्सच्या किमतींची तुलना करणे आणि प्रतिलीटरचा खरा दर समजणे अत्यंत कठीण होते. ग्राहकांची ही संभ्रमावस्था आणि बाजारातील छुप्या पद्धतीने होणारी फसवणूक थांबवण्यास सरकार पॅकिंगचे आकार स्टँडर्डाइज करणार आहे. 'पुरी ऑइल मिल्स'चे व्यवस्थापकीय संचालक विवेक पुरी यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे बाजारात पारदर्शकता येईल आणि पॅकेजिंगच्या क्लृप्त्यांऐवजी केवळ शुद्धतेच्या आधारावर निरोगी स्पर्धा सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला.
konkansamwad 
