भारतीय नाविक सेना युनियन यांच्यावतीने साखरपा येथील महात्मा गांधी हायस्कुल येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप.
रत्नागिरी.
मर्चंट नेव्ही क्षेत्रात सर्वाधिक अग्रेसर असणारी भारतीय नाविक सेना युनियन यांच्यावतीने संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील महात्मा गांधी हायस्कुल वसतीगृहातील सर्व विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. यावेळी युनियनचे अध्यक्ष रवींद्र बाईंग, जनरल सेक्रेटरी सुरेश साळस्कर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे जेणेकरून त्यांचे उज्ज्वल भवितव्य व्हावे व एक सामाजिक बांधिलकी जपली जावी म्हणून हा उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासमवेत कनोजिया सर, राजीव बाईंग, प्रशांत कदम, मेघी सरपंच बंटीशेठ गोताड, कोंडगाव ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कदम, भरत माने, मुख्याध्यापक कलोळे सर, जायगडे सर व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. यावेळी मान्यवरानी संस्थेच्या माध्यमातून झालेली कौतुकास्पद कार्य व उपक्रम याविषयी माहिती सांगून अभिनंदन केले. त्याचबरोबर यापुढेही असेच उज्ज्वल कार्य घडो अशा शुभेच्छा दिल्या. यंदाच्या वर्षी सुमारे 10,000 वाह्यांचे वाटप जिल्ह्यातील विविध भागात करण्यात आले आहे.
त्याचबरोबर विविध शाळात शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. मागील 25 वर्षे ही युनियन हा उपक्रम राबवत आहे.त्याचबरोबर गरजू रुग्णासाठी आरोग्याच्या सोयी ही संस्था मोफत उपलब्ध करून देत असते. मागील 25 वर्षे मर्चंट क्षेत्रात करियर संधी, या क्षेत्रातील विविध समस्या, सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवत असते. यापुढेही आपण अशाच प्रकारे आपले कार्य चालू ठेवणार असून याचा फायदा स्थानिक तरुणांना झाला पाहिजे असा विश्वास अध्यक्ष रवींद्र बाईंग व सेक्रेटरी सुरेश साळस्कर यांनी व्यक्त केला.