भात आणि नाचणी पिकविमा काढण्याचे आवाहन.

भात आणि नाचणी पिकविमा काढण्याचे आवाहन.

सिंधुदुर्ग.

   प्रधानमंत्री पिकविमा योजनेंतर्गत खरीप हंगाम 2023 या वर्षासाठी एक रुपयामध्ये भात व नाचणी पिकाचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपव्दारे 31 जुलै पर्यंत पिकाची नोंद करावी,असे आवाहन दोडामार्ग तालुक्याचे कृषी अधिकारी  प्रमोद बनकर यांनी केले आहे.
   दोडामार्ग तालुक्यातील चारही महसूल मंडळ मधील भात व नाचणी पिकाचा समावेश करण्यात आला आहे. भात पिकासाठी संरक्षित रक्कम म्हणून 51,760 प्रति हेक्टर आहे. तर नाचणी पिकासाठी 20,000 प्रति हेक्टर आहे. शेतकऱ्यांनी फक्त 1 रुपया भरुन बँक, प्राथमिक कृषि पतपुरवठा सह संस्था, आपले सरकार सेवा केंद्र यांच्यावतीने पिक पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. युनायटेड इंडिया जनरल इंन्शुरन्स कंपनी लि. पुणे या कंपनीची विमा कंपनी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांचा टोल फ्री क्रमांक 1800 233 7414 आहे. पिकविमा  योजनेत सहभाग घेण्यासाठी सातबारा, 8 अ उतारा, आधार कार्ड व बॅकपासबुकाची प्रत आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांनी एक रुपया भरुन, भात व  नाचणीचे 100 टक्के क्षेत्र पिक संरक्षित करुन जोखीम कमी करावी.