वेंगुर्ला नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये कोकण विभागात प्रथम.

वेंगुर्ला नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये कोकण विभागात प्रथम.

वेंगुर्ला.

   वेंगुर्ला नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटातील कामगिरी नुसार कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. देशामध्ये १ लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरातून पश्चिम विभाग ३७ वा, महाराष्ट्रामध्ये ३९ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच वेंगुर्ला शहरास जीएफसी १ स्टार व ODF ++ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे वेंगुर्ला नगरपरिषदेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
   वेंगुर्ला नगरपरिषदमार्फत प्रत्येक घरोघरी १०० टक्के विलगीकृत कचऱ्याचे संकलन केले जाते. या विलगीकृत कचऱ्याचे नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ (कंपोस्ट डेपो) येथे विविध २७ प्रकारात वर्गीकरण केले जाते. संकलित करण्यात आलेल्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती तसेच जैविक खत निर्मिती केली जाते. सुक्या कचऱ्याचे उपयोगानुसार विविध प्रकारात वर्गीकरण करून त्याची विक्री केली जाते. शहरातील बाजारपेठ, मुख्य रस्ते या ठिकाणी नियमितपणे स्वच्छता करण्यात येते.शहरातील सार्वजनिक शौचालयांचे नियमितपणे देखभाल दुरुस्ती करून स्वच्छता राखण्यात येते.