कुडाळ येथे १३ फेब्रुवारी रोजी मेस्त्री परीवार यांच्या वतीने श्री गणेश जयंती व श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन.

कुडाळ.
कुडाळ ज्योतिर्लिंग सॉ मिल कंपाऊंड येथे मेस्त्री परीवार यांच्या वतीने सत्यनारायणाची महापूजा मंगळवार दि १३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.४६ वर्ष अविरत अशी हि महापूजा मेस्त्री परीवार कडून होत आहे. तिर्लोट विजयदुर्ग यांच्या ढोल ताशांच्या गजरात १२ फेब्रुवारी रोजी गणपतीचे आगमन होणार आहे.मग सायंकाळी ५ वाजल्यापासून कुडाळ,मालवण येथील प्रसिध्द भजन मंडळाचे कार्यक्रम होणार तसेच पहाटे महापुरुष भजन मंडळ देवबाग यांच्याकडून काकड आरती चे आयोजन करण्यात आले आहे. तरी कार्यक्रमांना उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रभाकर मेस्त्री आणि परिवारांकडून करण्यात आले आहे.