राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमामध्ये जिल्ह्याची समाधानकारक कामगिरी.

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमामध्ये जिल्ह्याची समाधानकारक कामगिरी.

सिंधुदुर्ग.

  देशातील जनतेला दर्जेदार, गुणात्मक व वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध प्रकारचे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम नियमितपणे राबविले जातात. त्या पैकी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमामध्ये शासकीय उद्दीष्टामधील मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा नेत्र शस्त्रक्रिया गृह जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे मोफतरित्या केल्या जातात.
   शासनाने सन २०२३-२४ या वर्षाकरीता ५६६५ एवढ्या मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रियांचे उद्दीष्ट दिलेले असुन, त्या पैकी ४८८० एवढ्या मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. ८६ टक्के एवढी उद्दीष्ट पुर्तता झालेली आहे. उद्दीष्टातील १३८० मार्च २०२४ अखेर १०० टक्के उद्दीष्ट पुर्तता होईल. कणकवली, देवगड, सावंतवाडी, मालवण, कुडाळ या ठिकाणी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिरांमध्ये ३५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्या मधुन निवड केलेल्या १३८० रुग्णांच्या मोफत मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे करण्यात आलेल्या आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत ४० वर्षे वयाचे वरील दृष्टीदोष असणाऱ्या १४५० रुग्णांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले. मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रियोत्तर ४५६ रुग्णांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले.हा कार्यक्रम प्रभावीपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रा.आ.केंद्र, उप जिल्हा ग्रामीण रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय येथे राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.