भोगवे गावातून ९० टक्के मतदान महायुतीला, कार्यकर्त्यांचा प्रचार सभेत निर्धार

वेंगुर्ला
महायुतीचे लोकप्रिय उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने भोगवे गावात महापुरुष मंदिरात श्रीफळं ठेवुनं घरोघरी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
महायूती उमेदवार श्री नारायण राणे यांना भोगवे गावातून 90 टक्के मतदान मिळवुन देण्याचा निर्धार महायुतीच्या कार्यकर्त्यानीं केला. यावेळी माजी सभापती निलेश सामंत, भोगवे सरपंच अंकिता वायगणकर, माजी सरपंच महेश सामंत सुनील राऊत, चेतन सामंत भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर, माजी प.स. प्रणाली बंगे, मंदार सामंत, सिद्धेश वायगणकर, उल्हास कोळंबकर, संकेत केळूसकर, सागर मालणकर, कृष्णा रेंवणकर, गणेश खुळे, केशव कोळंबकर, पुंडलिक कोळंबकर, उद्देश कोळंबकर प्रीतम कासवकर, आरती कोळंबकर, राजश्री कोळंबकर यासह महायुती चे कार्यकर्ते उपस्थित होते.