चालू हंगामातील जिल्ह्यातील पहिले ऑलिव्ह रिडले कासवाचे घरटे आढळले वेंगुर्ला समुद्रकिनारी.

चालू हंगामातील जिल्ह्यातील पहिले ऑलिव्ह रिडले कासवाचे घरटे आढळले वेंगुर्ला समुद्रकिनारी.

वेंगुर्ला.

   तालुक्यातील सुखटणवाडी समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले समुद्र कासव मादीचे या हंगामातील पहिले घरटे दिसून आले आहे.सदर घरट्यात अंदाजे 115-120 अंडी असून बीच व्यवस्थापक बस्ताव बावतीस ब्रीटो यांच्या निगराणी खाली  घरटे संरक्षित आहेत. सदर अंड्यांचा पंचनामा कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांच्या उपस्थितीत मठ वनपाल सावळा कांबळे,मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत यांनी केलेत तसेच कासव अंडी संरक्षण व संवर्धनासाठी आवश्यक मार्गदर्शन स्थानिकांना करण्यात आलेले आहे.चालू हंगामात  सावंतवाडी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी ,सहायक वन संरक्षक सुनील लाड  यांच्या मार्गदर्शनाखाली  योग्य नियोजनातून आणि स्थानिक बीच व्यवस्थापक आणि वनकर्मचारी यांच्या मदतीने जास्तीत जास्त  समुद्री कासव अंडी संरक्षण व संवर्धन करण्याचे काम सुरू करण्यात येत आहे तरी सर्व स्थानिक नागरिक यांना या समुद्री कासव संवर्धनात वन विभागास सहकार्य करण्याचे आवाहन वन विभागा कडून करण्यात आले आहे.