उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहे जुलै ते डिसेंबर २०२४ शिबीरे.

सिंधुदुर्ग.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाव्दारे जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीत शिबीरे घेण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी दिली.
शिबिराचे वेळापत्रक पुढीप्रमाणे देवगड तालुक्यासाठी ३ जुलै, ६ ऑगस्ट, ३ सप्टेंबर, ८ ऑक्टोबर, ६ नोव्हेंबर, ४ डिसेंबर, कणकवली तालुक्यासाठी ४ जुलै, ७ ऑगस्ट, ४ सप्टेंबर, ९ ऑक्टोबर, ७ नोव्हेंबर, ५ डिसेंबर, मालवण तालुक्यासाठी १० जुलै, १३ ऑगस्ट, १० सप्टेंबर, १६ ऑक्टोबर, १३ नोव्हेंबर, ११ डिसेंबर, वेंगुर्ला तालुक्यासाठी ११ जुलै, १४ ऑगस्ट, ११ सप्टेंबर, १७ ऑक्टोबर, १४ नोव्हेंबर, १२ डिसेंबर, सावंतवाडी तालुक्यासाठी १८ जुलै, २१ ऑगस्ट, १८ सप्टेंबर, २३ ऑक्टोबर, २० नोव्हेंबर, १८ डिसेंबर, दोडामार्ग तालुक्यासाठी १९ जुलै, २२ ऑगस्ट, १९ सप्टेंबर, २४ ऑक्टोबर, २१ नोव्हेंबर, १९ डिसेंबर या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. या शिबीर कार्यालयाचे कर्तव्यार्थ कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी करतील.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी केले आहे.