आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार वार्षिक ३ हजार रुपये; मुख्यमंत्री ‘वयोश्री’ योजना.

सिंधुदुर्ग.
राज्यातील 65 वर्षे व त्यावरील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाय योजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधणे, उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मन स्वास्थ अबाधित ठेवण्यसाठी राज्यात "मुख्यमंत्री वयोश्री" योजना राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
या योजनेतंर्गत लाभार्थी व्यक्ती वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील, असे नागरिक पात्र समजण्यात येतील. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य, केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृध्दापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करु शकतो. लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. 2 लाखाचा आत असावे. सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारव्दारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामुल्य प्राप्त केले नसावे. प्रात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात रु. 3000/- थेट लाभ वितरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी "मुख्यमंत्री वयोश्री" योजना योजनेंसाठी अर्ज सादर करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेत आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र-
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ६५ वर्षावरील वय असलेल्या आणि वृद्धत्वामुळे आरोग्याच्या समस्या असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करणे हाआहे. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे जीवनमान सुधारत नाही. या समस्या लक्षात घेऊन, सरकारने ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक तीन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक व्हीलचेअर, चष्मे आणि इतर आवश्यक उपकरणे खरेदी करू शकतील आणि आरोग्यविषयक बाबींसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत तुम्ही 'ही' उपकरणे घेऊ शकता-
मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्याद्वारे जेष्ठ नागरिक अनेक उपयुक्त उपकरणे खरेदी करू शकतात. जेष्ठ नागरिकांसाठी खरेदीसाठी उपलब्धउपकरणांची यादी खाली दिली आहेः चष्मा, ट्रायपॉड, फोल्डिंग वॉकर, कमरेसंबंधीचा पट्टा, स्टिक व्हीलचेअर, ग्रीवा कॉलर, कमोड खुर्ची, गुडघा ब्रेस, श्रवणयंत्र इ.
मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रासाठी आवश्यक कागदपत्रे-
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी, आपल्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी अर्ज करताना सरकारने या कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक केले आहे. पुढे या योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची यादी दिली आहे.आधार कार्ड, ओळखपत्र (वोटर आयडी, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.), जात प्रमाणपत्रउत्पन्न प्रमाणपत्र, समस्येचे प्रमाणपत्र (डॉक्टरांकडून), बैंक खाते पासबुक, स्व-घोषणा प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल नंबर.
मुख्यमंत्री वायोश्री योजना महाराष्ट्र 2024 हेल्पलाइन
क्रमांक -
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत तुम्हाला जर या योजनेची संबंधित कोणतीही माहिती मिळवायची असेल तर तुम्ही समोर दिलेले हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून या योजनेची संबंधित सविस्तर माहिती अगदी सहजरीत्या मिळवून घेऊ शकता. त्यासाठी पुढील हेल्पलाइन क्रमांकावर कॉल कराः हेल्पलाइन क्रमांक: १८००-१८०- ५१२९.