राज्यातील कृषी विद्यापीठांचे आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्याबाबत लवकरच सामंजस्य करार : कृषिमंत्री धनंजय मुंडे.

राज्यातील कृषी विद्यापीठांचे आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्याबाबत लवकरच सामंजस्य करार : कृषिमंत्री धनंजय मुंडे.

मुंबई.

   राज्यातील कृषी विद्यापीठांचे आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्याबाबत भविष्यात सामंजस्य करार करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी  सांगितले.
   महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची 115 वी बैठक आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली. यावेळी कृषी आयुक्त रावसाहेब भागडे, कृषी परिषदेचे संचालक डॉ.हरिहर कौसडीकर राज्यातील चारही कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
   कृषी विद्यापीठांनी शिक्षण आणि संशोधनात भरीव कामगिरी करावी. यासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी सर्व महाविद्यालयातील इमारती, वसतिगृह आणि प्रयोगशाळा समवेत इतर पायाभूत सोयी सुविधा देखील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असाव्यात, अशीही सूचना यावेळी कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केली.