वागदे सरपंच यांनी मानले राज्य शासनाचे आभार.

वागदे सरपंच यांनी मानले राज्य शासनाचे आभार.

कणकवली.

  सरपंच,उपसरपंचांचे वेतन वाढ दुप्पट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील वागदे गावाचे सरपंच संदीप रमाकांत सावंत यांनी वागदे ग्रामपंचायती तर्फे महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहे."सरपंच उपसरपंच यांच्या मानधन मध्ये शासनाने भरीव वाढ केली त्या बद्दल शसनाचे जाहिर आभार" अशा प्रकारे त्यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.