वळीवंडे येथे आंबा व काजू बागेला भीषण आग; लाखोंचे नुकसान.
देवगड.
वळीवंडे येथील कलम बागांमध्ये शनिवारी सकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात हापूस आंबा व काजू कलमे आहेत ही आग रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कलम बागायतीमध्ये पसरत आरे फाटा नजीकच्या भागांमधून तोरसोळे गावाच्या सीमेपर्यंत गेली होती. वातावरणातील उष्मा व वाऱ्यामुळे ही आग पसरत गेली. आग आटोक्यात आणण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत स्थानिकांचे प्रयत्न सुरू होते आगेवर नियंत्रण मिळविण्यासाठी देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबची मदतही देण्यात आली होती. या आगीत बागायतदारांचे सुमारे १५ लाखाहून अधिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वळीवंडे येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कलम बागांमध्ये शनिवारी अचानक आग लागली ही आग वाऱ्यामुळे पसरत गेली.या आगीत वळीवंडे येथील प्रताप नारायण सावंत यांच्या बागेचे सुमारे एक लाख रुपये नुकसान, भालचंद्र पुंडलिक सावंत यांच्या बागेचे सुमारे एक लाख रुपयेचे नुकसान, प्रथमेश सदानंद कदम यांच्या बागेचे सुमारे एक लाखाचे नुकसान, संदीप बळीराम सावंत यांच्या कलम बागेला आग लागून सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान, हेमंत बाळकृष्ण दळवी यांच्या बागेला आग लागून सुमारे दीड लाखाचे नुकसान झाल्याची नोंद देवगड तहसील कार्यालयातील महसूल विभागात करण्यात आली आहे. दरम्यान ही आग तोरसोळे गावच्या सीमेपर्यंतच्या भागांमध्ये पसरत गेली होती. घटनास्थळा वरून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ४० ते ५० हेक्टर क्षेत्रातील कलम बागांना या आगीची झळ पोहोचली असून सुमारे पाच हजाराहून अधिक आंबा काजू कलमे यामध्ये होरपळली आहेत. ती आग विझविण्यासाठी भाजपचे बूथ अध्यक्ष महेश सावंत तंटामुक्त अध्यक्ष मनोज सावंत उपसरपंच निलेश सावंत,दत्तू सावंत यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी ही आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले . ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.