वेंगुर्ला पाटकर हायस्कुलच्या उपक्रमशील शिक्षिका समृद्धी पिळणकर - मुननकर यांना नॅशनल एज्युकेशन स्टार पुरस्काराने सन्मानित.

वेंगुर्ला पाटकर हायस्कुलच्या उपक्रमशील शिक्षिका समृद्धी पिळणकर - मुननकर यांना नॅशनल एज्युकेशन स्टार पुरस्काराने सन्मानित.

सिंधुदुर्ग.

   रा.कृ.पाटकर हायस्कुल वेंगुर्ला या प्रशालेच्या उपक्रमशील आदर्श शिक्षिका सौ.समृद्धी संजय पिळणकर - मुननकर यांचा ग्रेटनंस ऑफ मॉडर्ननिगेशन ऑफ जेनीयस युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल रिसर्च पब्लीकेशन ऑफ बिझीनेस मॅनेजमेंट (आय.आर.पी.बी.एम.) पुरस्कृत कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे रविवार १९ मे २०२४ रोजी नॅशनल एजुकेशन स्टार पुरस्काराने*सन्मान करण्यात आला.
    सौ समृद्धी संजय पिळणकर - मुननकर यांनी कोविड काळात मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री सहाय्यता निधिला रूपये ५१ हजारांचा धनादेश तत्कालीन पालकमंत्री सामंत यांच्याकडे सुपूर्द केला होता. विशेष म्हणजे तो त्यांच्या सेवेतील पाहिलाच पगार होता. कोविड काळात जीएमसी बांबोळी हॉस्पिटलमध्ये कोविडचा वाढता प्रादुर्भाव असूनही गंभीर जखमी तरुणास रक्तदान करणे, रक्तदान शिबिरे घेणे,रक्तदानाबाबत तरुणांना प्रोसाहित करणे,निराधार महिलांना मदत करणे,विद्यार्थीनी दत्तक घेणे अशा बऱ्याच सामाजिक कार्यांची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.यापूर्वी त्यांना अध्यापक शिक्षकेतर संघटना सिंधुदुर्ग यांचा संत मीराबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह या मीडियाच्या वतीने गुरुगौरव पुरस्कार, पद्माश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते राष्ट्रीय लोकसेवा शैक्षणिक सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  यावेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध सिने अभिनेते सुनील गोडबोले,डॉ शिवाजीराव शिंदे (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहा.निबंधक, सदानंद सदनशिव (उप पोलीस सुपरिंटेंडन्ट कोल्हापूर), दिनेश उघडे (उद्योजक), डॉ.रजनीताई शिंदे (अध्यक्ष वेद फौंडेशन, इचलकरंजी), विनोद नजारे (पत्रकार), संस्थेचे अध्यक्ष बी.एन.खरात आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.