कोकणाला हक्काचा खासदार मिळाल्याने कोकणचा कायापालट झपाट्याने होईल : विशाल परब. राणेंच्या साथीने जिल्ह्यात रोजगार देण्याचा प्रयत्न करणार.

कोकणाला हक्काचा खासदार मिळाल्याने कोकणचा कायापालट झपाट्याने होईल : विशाल परब.  राणेंच्या साथीने जिल्ह्यात रोजगार देण्याचा प्रयत्न करणार.

सावंतवाडी.

   कोकणी जनतेचे नेतृत्व पुन्हा एकदा "पार्लमेंट" मध्ये गेले आहे. आता आम्हाला आमचा हक्काचा खासदार मिळाला आहे. त्यामुळे कोकणाचा आता झपाट्याने कायापालट होईल, असा विश्वास भाजपा युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान कोकणात आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या काळात उद्योग, कंपन्या आणि पंचतारांकित हॉटेल यावीत आणि येथील युवकांना स्थानिक स्तरावर रोजगार मिळावा यासाठी आम्ही राणेंना गळ घालणार आहोत, असे त्यांनी सांगितले. महायुतीचे विजयी उमेदवार नारायण राणे यांच्या विजयानंतर श्री.परब यांनी आज पत्रकार परिषद घेवून राणेंच्या विजयात महत्वाचे ठरणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांचे आभार मानले.यावेळी माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, अमित परब, केतन आजगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
     यावेळी श्री. परब म्हणाले, राणेंच्या रुपाने पुन्हा एकदा कोकणाला हक्काचा खासदार मिळाला आहे. या ठिकाणी आता कोकणचा विकास झपाट्याने होणार आहे. गेल्या १० वर्षात असलेला विकासाचा "बॅकलॉग" भरुन निघणार आहे. आता येणाऱ्या काळात येथील जनतेच्या भल्यासाठी मोठ-मोठे उद्योग, कंपन्या आणि पंचतारांकित हॉटेल या ठिकाणी आणावेत, येथील युवकांना स्थानिक स्तरावर युवकांना रोजगार मिळावा यासाठी यासाठी आम्ही राणेंना गळ घालणार आहोत.यावेळी त्यांनी राणेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देणाऱ्या मतदारांचे तसेच कार्यकर्त्यांचे आभार मानले. काही ठिकाणी मते कमी-जास्त मिळाली. मात्र यावर चर्चा करणार नाही तर त्या ठिकाणी नेमकी नाराजी काय? याचा शोध घेतला जाणार आहे आणि यापुढे मताचा आकडा वाढावा यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत, असे ते म्हणाले.
   श्री.राणे यांच्या विजयाचे शिल्पकार पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे आहेत. सर्वांनी एकत्र काम केल्यामुळे आम्ही हे यश गाठू शकलो, असा दावा त्यांनी केला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.