रत्नागिरी पोलीस दलातील १७ जणांना पोलीस महासंचालकांचे पदक.
रत्नागिरी.
जिल्हा पोलीस दलातील १७ पोलीस अंमलदारांना त्यांच्या प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र जाहीर करण्यात आले आहे.रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार दीपक मनोहर साळवी, संगमेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार प्रशांत संभाजी शिंदे,हातखंबा महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस फौजदार सचिन मधुकर सावंत,कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस फौजदार समेळ विठ्ठल सुर्वे, राजापूरचे सहाय्यक पोलीस फौजदार प्रमोद अनंत वाघाटे, जयगडचे सहाय्यक पोलीस फौजदार संदीप मनोहर साळवी, पोलीस मुख्यालयातील सहाय्यक पोलीस फौजदार अश्विनी अनिल निखार्गे,वाहतूक मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस फौजदार नारायण केशव रोडे, पोलीस मुख्यालयातील सहाय्यक पोलीस फौजदार सुशील जगन्नाथ पंडित,हातखंबा महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस फौजदार घनशाम रामचंद्र जाधव या सहाय्यक पोलीस फौजदारांना प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले.पूर्णगड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अवधूत सुधाकर सुर्वे , हवालदार ललित विठ्ठल देऊसकर,कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे हवालदार वैभव विजय जाधव, महिला कक्षाच्या हवालदार मधुरा मिलिंद गावडे, हातखंबा महामार्ग पोलीस मदत केंद्राचे हवालदार गिरीश भिवा सावंत, शिरगावचे पोलीस हवालदार बिरुदेव सिदा कोळेकर, रत्नागिरी ॲनेलिसीस विंगचे हवालदार रमिज सिकंदर शेख यांना प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, पोलीस अधिकारी यांनी सर्व पोलीस अंमलदारांचे अभिनंदन केले.