बाळा गावडे पुन्हा ठाकरे सेनेत; सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची मिळणार जबाबदारी.
सावंतवाडी
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर गेले दीड वर्ष शांत असलेल्या बाळा गावडे यांनी आज अखेर पुन्हा ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला त्यांना आता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात येणार आहे या ठिकाणी आमदार राजन तेली यांना ठाकरे शिवसेनेत प्रवेश दिल्यामुळे नाराज होवून त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला होता मात्र दरम्यानच्या काळात ते शांत होते तूर्तास राजन तेली यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे आता पुन्हा आपण स्वगृही परतत आहोत उद्धव ठाकरे यांनी दिलेली जबाबदारी आपण पार पडणार आहोत असे त्यांनी सांगितले आज मातोश्रीवर त्यांचा प्रवेश झाला यावेळी युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे माजी खासदार विनायक राऊत जिल्हाप्रमुख बाबुराव उपस्थित होते यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा अशा सूचना यावेळी त्यांना दिल्या. यापूर्वी त्यांची कट्टर राणे समर्थक अशी ओळख होती त्यानंतर त्यांनी राणेंची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यांना त्या ठिकाणी विधानसभा लढण्याची संधी देण्यात आली होती त्यानंतर त्यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता परंतु ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात त्या ठिकाणी राजन तेली यांना लढण्याची संधी देण्यात आली असल्यामुळे नाराज असलेल्या गावडे यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता गेले काही दिवस ते शांत होते.
konkansamwad 
