युतीधर्म पाळत रासप पक्ष करणार महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा प्रचार.

युतीधर्म पाळत रासप पक्ष करणार महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा प्रचार.

सिंधुदुर्ग.

      महाराष्ट्र राज्यात महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी देऊन आमच्या पक्षाचा सन्मान केला त्याबद्दल महायुतीचे सर्व नेत्यांचे कोकण विभाग प्रसिध्दी प्रमुख सुशांत पोवार आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आभार मानले. कोकणचा सर्वांगीण विकास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातूनच झाला आहे. आणि त्यांनीच या कोकणाला सावरले आहे त्यामुळे युती धर्म पाळत आम्ही सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी श्री. राणे यांचा ग्राउंड लेव्हलला जाऊन प्रचार करणार व त्यांच्या मताधिक्यामध्ये खारीचा वाटा उचलण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्ये प्रयत्न करेल असा विश्वास सुशांत पोवार आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांना दिला.
   आमदार नितेश राणे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या काळात आपले सर्व प्रश्न मार्गी लागतील तुम्ही आमच्या संपर्कात कायमस्वरूपी रहा निवडणुकीपुरते संपर्कात न राहता इतर वेळी सुद्धा आपण आमच्या संपर्कात राहिला तर आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या समाज बांधवांना निधी स्वरूपात मदत करून विकसित सिंधुदुर्ग रत्नागिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि आपल्याला बळ देण्याचे काम देखील आमच्या माध्यमातून होईल आपण एकदिलाने काम करावं आणि तुम्ही ते कराल असं विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. नवलराज काळे यांच्या माध्यमातून समाजाचे बरेचसे प्रश्न मार्गी लावले असून पुढील येणाऱ्या काळामध्ये तुम्हा सर्वांना एकत्र करून तुमच्या सर्व प्रश्नांवरती लक्ष देऊ असा  शब्द आमदार नितेश राणे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला.
   यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी सिमंतिनी मयेकर (कोकण विभाग महिला आघाडी अध्यक्षा) सुशांत पोवार (कोकण विभाग प्रसिद्धी प्रमुख) उज्वला येळावीकर (सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा) युवराज खराडे (सिंधुदुर्ग विधानसभा अध्यक्ष) आणि तन्मय राणे (जिल्हा कार्यकारी सदस्य) उपस्थित होते.