राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे नवनिर्वाचित सेवादल प्रदेशाध्यक्ष गिरीश सावंत यांचा डिगस गावात सत्कार

राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचे नवनिर्वाचित सेवादल प्रदेशाध्यक्ष गिरीश सावंत यांचा डिगस गावात सत्कार

 

कुडाळ

 

      कुडाळ तालुक्यातील डिगस गावचे सुपुत्र गिरीश सावंत यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सेवादलच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डिगस ग्रामपंचायत सरपंच पुनम पवार यानी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. गिरीश सावंत हे राष्ट्रवादी काँग्रेस चे निष्ठावान कार्यकर्ते असुन मुंबई मध्ये दहिसर-आनंदनगर हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे.मुंबई महानगरपालिकेची नगरसेवक पदाची निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून लढवलेली असून आता कोकणची संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. अश्या ग्रामीण भागामध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्याला प्रदेश स्तरावर पक्षाने मोठी जबाबदारी दिल्याबद्दल स्वतःच्या गावाच्या ग्रामपंचायती मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.
         यावेळी माजी जि.प.सदस्य अमरसेन सावंत, माजी पं.स.उपसभापती शिवाजी घोगळे, माजी सरपंच नित्यानंद कांदळगावकर, माजी सरपंच राजू पवार व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.