आदर्श शाळा जोशी विद्यामंदिर जामसंडे नं १ मध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा उत्साहात साजरा.

देवगड.
तालुक्यातील जामसंडे येथील जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा जोशी विद्यामंदिर जामसंडे नं १ या शाळेत सोमवार दिनांक १ एप्रिल २०२४ पासून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सन २०१५-१६ पासून इयत्ता पाहिलीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली शाळा आहे.त्यामुळे या प्रशालेची पटसंख्या वर्षानुवर्षे वाढत आहे.
सदर कार्यक्रमात मुलांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले.तसेच मुलांना इलेक्ट्रिक रिमोट कंट्रोल कार मधून फिरविण्यात आले.मुलांनी विविध रंगींबेरंगी फुगे उडवून या कार्यक्रमाचा आनंद घेतला.यावेळी पाहिलीत प्रवेश घेणारे २५ विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन समिती सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन औक्षण केले.खाऊवाटप आणि आभार मानून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद चांदोस्कर, उपाध्यक्ष माधवी मेस्त्री, निलेश घाडी, एकनाथ घाडी, योगेश जाधव, दीपाली आयरे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्याध्यापक सातार्डेकर, सुमेधा तेली, राजश्री मोंडकर, सुधा घाडी, क्रांती सारंग, दिनेश दळवी, राजेंद्र कांबळे, यांचे उत्तम सहकार्य लाभले.