जिल्हा ह्युमन राईटच्या वतीने नवनियुक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची सदिच्छा भेट.

सिंधुदुर्ग.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने जिल्ह्यातील नवनियुक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची सदिच्छा भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर,उपाध्यक्ष मिलिंद धुरी,सचिव विष्णू चव्हाण, खजिनदार ॲड.मोहन पाटणेकर, सदस्य आनंद कांडरकर,सदस्य बाळा कोरगांवकर,कुडाळ तालुका अध्यक्ष आर के सावंत संजय पालव ,नामदेव जानकरआदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील जनतेच्या गोरगरिबांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न करावे अशी मागणी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली.