दाजीपूर ते राधानगरी रस्ता १० मार्च ते ३० एप्रिल पर्यंत वाहतुकीस बंद

सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्हा हद्द ते दाजीपूर राधानगरी मुदाळतिट्टा- निढोरी-निपाणी कलादगी रस्ता रा.मा. क्र.178 कि.मी. 66/00 ते 136/500 रस्त्याचे दुरुस्ती व नुतणीकरणाचे काम करण्यात येणार असल्याने दिनांक 10 मार्च ते 30 एप्रिल 2025 या 45 दिवसांच्या कालावधीसाठी दाजीपूर ते राधानगरी रस्ता मोटर वाहन कायदा 115 व 116 अन्वये जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.दाजीपुर ते राधानगरी रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करुन हलक्या व लहान वाहनांकरीता वालिंगा - महे पाटी - कोते - धामोड - शिरगाव - तारळे - पडळी- कारीवडे - दाजीपुर रस्ता प्रजिमा 29 चा वापर करावा. तसेच अवजड व मोठी वाहतुक या रस्त्यावरुन पुर्णपणे बंद करुन कोकणातुन कोल्हापूरकडे येणारी अवजड वाहने फोंडा- कणकवली फाटा- नांदगाव- तळेरे- वैभववाडी- गगनबावडा मार्गे कोल्हापूर अशी वळविण्यात यावी.तसेच कर्नाटकातून येणारी अवजड वाहने कोकणामध्ये जाण्याकरीता आंबोली-आजरा-गडहिंग्लज व संकेश्वर - गडहिंग्लज - आजरा - आंबोली अशी वाहतुक वळविण्यात यावी, असेही या अधिसुचनेद्वारे कळविण्यात आले आहे.