देवगड एसटी बस स्थानक नूतनीकरणाचा आ.नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ.

देवगड.
देवगड बस स्थानकाचे नूतनीकरणाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते आज करण्यात आला सुमारे एक कोटी चाळीस लाख रुपये खर्च करून देवगड बस स्थानकाची प्रशासकीय इमारत, आगार व्यवस्थापकांचे निवासस्थान, स्वच्छतागृहे व ड्रेनेज सिस्टीम यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत.
देवगड बस स्थानकाची प्रशासकीय इमारत यापूर्वीच संपूर्ण नादुरुस्त झाली आहे स्लॅप चे सिमेंट पडत असल्याने या इमारतीचा वापर बंद करण्यात आला होता तसेच आगार व्यवस्थापकांचे निवासस्थान याच प्रशासकीय इमारतीत असून अनेक समस्यांमुळे त्याचाही वापर बंद करण्यात आला होता. देवगड बस स्थानकाची शौचालय व स्वच्छतागृहे यांच्याही दुरुस्ती तसेच ड्रेनेज सिस्टीम याचीही दुरुस्ती यामध्ये घेण्यात येणार आहे.यावेळी आमदार नितेश राणे यांनी विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्यासह देवगड आगाराची पाहणी केली.
आमदार नितेश राणे यांच्या समिती यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे सरचिटणीस संदीप साटम, देवगड जामसांडे नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरुल, सोबत सर्व आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.