अणसूर पाल हायस्कूलचा निकाल १०० टक्के. निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.

वेंगुर्ला.
अणसूर पाल हायस्कूल अणसूर शाळेचा निकाल यंदाही १००% लागला आहे. मंदार बापू नाईक याला ९५% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर यज्ञेश भास्कर गावडे हा ९३% गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आला आणि भूमिका अनंत राऊळ हिला ८८.२०% गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला.यामधे विशेष श्रेणीत १९, प्रथम श्रेणीत ११ व द्वितीय श्रेणीत २ मिळून एकुण ३२ ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल १००% लागला आहे. निकालाची उज्वल परंपरा अणसूर पाल हायस्कूल अणसूर शाळेने या वर्षी देखील राखलेली पहावयास मिळाले.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांंचे अणसूर पाल विकास मंडळ मुंबई संस्था अध्यक्ष आत्माराम गावडे, सेक्रेटरी लिलाधर गावडे, खजिनदार बाळकृष्ण तावडे तसेच अणसूर पाल हायस्कूल अणसूर शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर, सदस्य दिपक गावडे, दत्ताराम (नाना) गावडे, देवू (बाबी) गावडे, मुख्याध्यापक राजेश घाटवळ, शिक्षक अक्षता पेडणेकर, विजय ठाकर,चारुता परब व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.