आमदार नितेश राणे यांची भाजपच्या प्रवक्तेपदी पुन्हा नियुक्ती. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून घोषणा.
कणकवली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून महाराष्ट्र भाजपाची भूमिका मांडण्याकरिता व प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया देण्याकरीता पत्रकार परिषद घेणे व मीडिया बाइट देण्याकरता अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विभागणी करण्यात आली असून सकाळी ९ वाजता पक्षाची भूमिका मांडण्याकरता जाहीर करण्यात आलेल्या प्रमुख नेत्यांच्या यादीमध्ये कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना स्थान देण्यात आले आहे.मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अन्य भाजप नेत्यांचा देखील या यादीमध्ये समावेश आहे.
दुपारी ४ वाजता घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषद व बाईट करता भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्यासह भाजपाच्या अन्य नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर विभागीय बाईट व पत्रकार परिषदे करता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपाच्या अन्य नेत्यांचा समावेश या प्रवक्त्यांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांनी यापूर्वी अनेकदा पक्षाची भूमिका ठोस व यशस्वीपणे मांडल्याने त्यांचा पुन्हा या भाजपाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यादी जाहीर केली आहे.
दरम्यान सकाळच्या ९ वाजण्याच्या सत्रात
आशिष शेलार, अध्यक्ष, भाजप मुंबई, रावसाहेब दानवे, माजी केंद्रीय राज्यमंत्री, पंकजा मुंडे, राष्ट्रीय सचिव, प्रवीण दरेकर, गटनेता, विधानपरिषद सदस्य व नितेश राणे, विधानसभा सदस्य यांचा समावेश आहे.तर संध्याकाळी सायंकाळी ४ वाजताच्या दुसऱ्या सत्रात सुधीर मुनगंटीवार, मंत्री, महाराष्ट्र राज्य, अशोक चव्हाण, राज्यसभा सदस्य,गिरीष महाजन, मंत्री, महाराष्ट्र राज्य,माधव भंडारी, प्रदेश उपाध्यक्ष,अतुल भातखळकर, विधानसभा सदस्य,राम कदम, विधानसभा सदस्य यांच्यावर जबाबदारी दिली आहे.