आरोस येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या
आरोस
आरोस येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या २८ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार असून यानिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
यानिमित्त सकाळी मंदिरात पुजाअर्चा व अभिषेक, त्यानंतर देवीची ओटी भरणे, केळी ठेवणे, नवस बोलणे-फेडणे, गाऱ्हाणे आदी कार्यक्रमांना सुरूवात होईल. रात्री देवीची सवाद्य पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. भाविकांनी या जत्रौत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन आरोस मानकरी व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

konkansamwad 
