मनसेच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन.

मनसेच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन.

सिंधुदुर्ग.

   महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने तर्फे मनविसे जिल्हाध्यक्ष
केतन सावंत यांच्या संकल्पनेतून दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठी राज्यभाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त मुलांनी आपला सहभाग दर्शवावा व मराठी ही जिव्हाळ्याची माय मराठी अशी ओळख असलेली राज्यभाषा आनंदाने अभ्यासात आणावी याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे कु.अमोल नाईक व सावंतवाडी युनिट अध्यक्ष कु.साईल तळकटकर यांनी वेंगुर्ला तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांना भेट देऊन या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभाग दर्शवावा व मुलांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शाळा व महाविद्यालयांना निवेदन देऊन मराठी भाषेबद्दलचे आपले मत निबंधाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले.