माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून दत्ता सामंत यांचा मांजरेकर कुटुंबीयांना मदतीचा हात.
मालवण.
तालुक्यातील बांदीवडे बाजारवाडी येथील गरीब कुटुंबातील मंगल अनंत मांजरेकर यांच्या राहत्या घराचे छप्पर गुरुवारी संध्याकाळी कोसळून मोठे नुकसान झाले होते.या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे अचानक कोसळलेल्या संकटामुळे मंगल मांजरेकर कुटुंब खचून गेले होते.अशा या कठीण प्रसंगात पुन्हा छप्पर कसे उभारावे या विवंचनेत हे संपूर्ण कुटुंब होते. दरम्यान याबाबत माहिती मिळताच भाजप प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी रविवारी बांदिवडे येथे भेट देत पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली आहे. माजी खासदार डॉ.निलेश राणे यांच्या माध्यमातून या कठीण प्रसंगात मांजरेकर यांना थोडासा दिलासा मिळावा यासाठी सदर मदत देण्यात आली असल्याचे यावेळी सामंत म्हणाले. तसेच यावेळी उपस्थित सरपंच आशु मयेकर यांच्या जवळ घरकुल योजनेमधून मांजरेकर यांना लाभ मिळवून द्यावा अशी सामंत यांनी सूचना केली.
गोरगरीब ग्रामस्थांच्या मदतीसाठी दत्ता सामंत नेहमीच धावून जात असतात. दत्ता सामंत यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वर आमच्या कुटुंबासाठी धावून आला तसेच भारतीय जनता पक्ष आणि दत्ता सामंत यांचे कठीण प्रसंगात दिलेली साथ आम्ही कधीही विसरणार नाही. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून दत्ता सामंत यांचा प्रत्यय आल्याची भावना यावेळी मंगल मांजरेकर यांनी व्यक्त केली. घराचे छप्पर कोसळून नुकसान झाल्यानंतर मंगल मांजरेकर याना मदत मिळावी यासाठी माजी उपसभापती छोटू ठाकूर, लक्ष्मी पेडणेकर तसेच भाजप पदाधिकारी यानी भाजप नेते दत्ता सामंत यांचे लक्ष वेधले होते.
यावेळी माजी उपसभापती छोटू ठाकूर, दीपक पाटकर, मालवण ता.खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, माजी जी. प. सदस्य जेरॉन फर्नांडिस, संतोष कोदे, प्रफुल्ल प्रभू, सतीश बांदिवडेकर, आनंद परब, ललित चव्हाण, अशोक बागवे, सुनील घाडी, जितेंद्र परब, तात्या हिंदळेकर, भाई मांजरेकर, राजू बिडये, सचिन हडकर, अजय पडवळ, आबा आईर, संतोष गावकर, बबन मुणगेकर, जुबेर सय्यद, आशिष चेंदवनकर, पुरुषोत्तम शिंगरे,शाहुलखन बांदिवडेकर तसेच भाजप पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते