केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भरला उमदेवारी अर्ज.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भरला उमदेवारी अर्ज.

रत्नागिरी.

   रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचा मिळून बनलेल्या मतदार संघात अखेर भाजपाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गुरूवारी उमेदवारी जाहीर केली. आज रत्नागिरी येथे राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून रोड शो करत मोठ शक्तिप्रदर्शन केलेल पाहायला मिळाल. अर्ज भरते वेळी त्यांच्या सोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे देखील उपस्थित होते. सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरीतील असंख्य भाजपा कार्यकर्ते व खंदे राणे समर्थक मानले जाणारे अनेकजण उमेदवारी अर्ज भरताना नारायण राणे सोबत होते. शिवसेना ही देखील महायुतीचा भाग असल्यामुळे शिवसेना कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.भाजपच्या स्थापनेपासून मागील ४४ वर्षांत पहिल्यांदाच महायुतीतून लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा भाजपला मिळाली आहे.सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान होणार असून नारायण राणे समोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे विनायक राऊत यांचे आवाहन आहे.