मालवणचा आठवडा बाजार पूर्ववत मुख्य बाजारपेठेत नेण्याच्या मागणीसाठी व्यापारी आक्रमक....नगरपालिकेवर काढला धडक मोर्चा

मालवणचा आठवडा बाजार पूर्ववत मुख्य बाजारपेठेत नेण्याच्या मागणीसाठी व्यापारी आक्रमक....नगरपालिकेवर काढला धडक मोर्चा

 

मालवण

 

      कोरोनाच्या काळात देऊळवाडा सागरी महामार्गावर तात्पुरत्या स्वरूपात हलवण्यात आलेला मालवणचा पारंपरिक सोमवारचा आठवडा बाजार पुन्हा एकदा 'सोमवार पेठ' या मुख्य बाजारपेठेतच भरवण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी मालवणमधील शेकडो व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला. "२०२० मध्ये कोरोनाचे कारण देऊन हलवलेला बाजार सहा वर्षे उलटली तरी तिथेच आहे. आता प्रशासनाने वेळ काढूपणा थांबवावा, अन्यथा मालवणात 'जनरेशन झेड'ची ताकद दाखवून दिली जाईल," असा संतप्त इशारा युवा व्यापाऱ्यांनी दिला आहे.या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, ज्येष्ठ व्यापारी, युवा व्यापारी आणि भाजी विक्रेत्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत नगरपालिकेत व्यापाऱ्यांची बाजू मांडली.व्यापारी संघाच्या वतीने नगरपालिकेला सादर केलेल्या निवेदनात सागरी महामार्गावर भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचण्यात आला. सागरी महामार्गावर बाजार भरल्याने सोमवारी प्रचंड रहदारी होते. ट्रॅफिक जाम होऊन लहान-मोठे अपघात घडत आहेत. अगदी रुग्णवाहिकेलाही रस्ता मिळणे कठीण होते. बाहेरून येणारे व्यापारी थेट महामार्गावरच व्यापार करून निघून जातात. त्यामुळे ग्राहक मुख्य बाजारपेठेत येत नाहीत. परिणामी मासे मार्केट, कोकणी मेवा आणि स्थानिक भाजी विक्रेत्यांसह शहरातील इतर छोट्या-मोठ्या दुकानदारांचे आर्थिक नुकसान होत आहे. मासे मार्केट, कोकणी मेवा आणि खेड्यापाड्यातून येणारा भाजीपाला एकत्र मिळण्याचे केंद्र म्हणजे 'सोमवार पेठ' होती. महामार्गावरील बाजारामुळे मुख्य बाजारपेठेतील गजबज कमी झाली आहे.महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची अत्याधुनिक पार्किंग जागा उपलब्ध असून नेरुरकर गल्ली, सकपाळ नाका गल्ली, आणि सारस्वत बँक समोरील गल्ली येथे बाजार भरवल्यास मुख्य बाजारपेठ पूर्ववत गजबजेल.नगरपालिका सभागृहात नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर आणि मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. नगरपालिकेच्या नवीन भाजी मार्केटचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या ३ ते ४ महिन्यांत ते पूर्ण होईल. त्यानंतर सर्व फिरत्या व्यापाऱ्यांची तिथे सोय केली जाईल," असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले. मात्र, या उत्तराने युवा व्यापाऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी पुढील सोमवारपासूनच बाजार मुख्य बाजारात भरवण्याची मागणी लावून धरली.मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी स्पष्ट केले की, "हा विषय संपूर्ण शहराशी निगडित आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर हा विषय मांडून, सर्वसमावेशक आणि कोणावरही अन्याय होणार नाही असा निर्णय घेतला जाईल.सागरी महामार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हा बाजार मुख्य बाजारपेठेत हलवण्याची मागणी मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी सर्वप्रथम तहसीलदार, पालिका व पोलीस प्रशासनाकडे केली होती. तहसीलदार यांनीही पालिकेला यावर योग्य तो निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. गॅरी अन्ननसिएशन यांनी स्पष्ट केले की, "मुख्य रस्त्यावर किंवा महामार्गावर आठवडा बाजार भरवू नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत. तरीही महामार्गावर बाजार भरवून नियमांचे उल्लंघन केले जात आहे.महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची अत्याधुनिक पार्किंग जागा उपलब्ध असून नेरुरकर गल्ली, सकपाळ नाका गल्ली, आणि सारस्वत बँक समोरील गल्ली येथे बाजार भरवल्यास मुख्य बाजारपेठ पूर्ववत गजबजेल.नगरपालिका सभागृहात नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर आणि मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. नगरपालिकेच्या नवीन भाजी मार्केटचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या ३ ते ४ महिन्यांत ते पूर्ण होईल. त्यानंतर सर्व फिरत्या व्यापाऱ्यांची तिथे सोय केली जाईल," असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले. मात्र, या उत्तराने युवा व्यापाऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी पुढील सोमवारपासूनच बाजार मुख्य बाजारात भरवण्याची मागणी लावून धरली.मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी स्पष्ट केले की, "हा विषय संपूर्ण शहराशी निगडित आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर हा विषय मांडून, सर्वसमावेशक आणि कोणावरही अन्याय होणार नाही असा निर्णय घेतला जाईल."सागरी महामार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हा बाजार मुख्य बाजारपेठेत हलवण्याची मागणी मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी सर्वप्रथम तहसीलदार, पालिका व पोलीस प्रशासनाकडे केली होती. तहसीलदार यांनीही पालिकेला यावर योग्य तो निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. गॅरी अन्ननसिएशन यांनी स्पष्ट केले की, "मुख्य रस्त्यावर किंवा महामार्गावर आठवडा बाजार भरवू नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत. तरीही महामार्गावर बाजार भरवून नियमांचे उल्लंघन केले जात आहे.