मालवणच्या ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची ‘वंदे मातरम् कॅम्प’ साठी निवड

मालवणच्या ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची ‘वंदे मातरम् कॅम्प’ साठी निवड

मालवण

      मालवण येथील ॲड. ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांची कर्नाटकातील म्हैसूर येथे होणाऱ्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी युवा प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. कोकण विभागातून प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली असून महाराष्ट्रातील २५ युवा प्रतिनिधींमध्ये त्यांचा समावेश आहे.भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत माय युवा भारत संस्थेच्या वतीने हा कॅम्प २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ दरम्यान म्हैसूर येथील BSNL रिजनल टेलिकॉम ट्रेनिंग सेंटर येथे होणार आहे. या राष्ट्रीय शिबिरात केरळ, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, मणिपूर आणि राजस्थान या राज्यांतील निवडक युवक सहभागी होणार आहेत.ॲड. ऐश्वर्य मांजरेकर हे कुडाळ येथील व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेजमध्ये एलएल.एम. द्वितीय वर्षाचे विद्यार्थी असून शिक्षणासोबतच सामाजिक कार्य, युवकांचा सहभाग आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात सक्रिय आहेत.या निवडीमुळे मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.