खासदर सुप्रिया सुळे २७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
सावंतवाडी.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे येत्या 27 ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांचा मेळावा दोडामार्ग येथे होणार आहे. तसेच आगामी होऊ घातलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मार्फत निवडणुका लढवल्या जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक दुपारी दोन ते तीन या वेळेत हॉटेल मँगो येथे होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व अन्य आघाडीतील घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक होणार आहे. तब्बल तेरा वर्षानंतर प्रथमच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे येत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय महिला नेत्या सौ. अर्चना घारे परब व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. दोडामार्ग व सावंतवाडी येथे 27 ऑक्टोबरला खासदार सुप्रिया सुळे येणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होणार आहे.