सावंतवाडीतील श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक उत्सव १ फेब्रुवारी रोजी.
सावंतवाडी.
तळकोकणातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र व गोवा राज्यासह अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील ३६५ खेडयांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा गुरुवार दि. १ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा होतो.यावर्षीही त्या निमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी अभिषेक व पूजा, उत्सवानिमित्त पूजापाठ, त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन व तिर्थप्रसाद मग नामांकीत भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम आणि सायंकाळी 7 वाजता सावंतवाडी येथील महापुरुष दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
या देवस्थानची ओळख भक्तगणात नवसाला पावणारा किंवा रक्षण करणारा देव म्हणूनच आहे.तरी सर्व भाविकांनी उत्सवाला उपस्थित राहावे असे आवाहन विद्याधर नाईक शितप यांनी केले आहे.