२२ जुलै रोजी बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात रक्तदान शिबिर

२२ जुलै रोजी बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात रक्तदान शिबिर

वेंगुर्ले 

 

      महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर  शिबिर सकाळी ८.०० ते दुपारी १२.३० या वेळेत महाविद्यालय परिसरात आयोजित करण्यात येणार असून महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने रक्तदान करणार आहेत.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेले रुग्ण, थॅलेसेमिया रुग्ण तसेच इतर अनेक गरजूंसाठी रक्ताची आवश्यकता भासते. अशा परिस्थितीत रक्तदान करून एखाद्याला नवजीवन देण्याचे कार्य प्रत्येक नागरिकाने करावे, असा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयामार्फत दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, मानवता आणि समाजसेवेची भावना रुजविण्यासाठी महाविद्यालय सातत्याने विविध उपक्रम राबवत असते.तरी वेंगुर्ला तालुक्यातील नागरिक, युवक तसेच नियमित रक्तदात्यांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. धनराज गोस्वामी यांनी केले आहे.