आनंदवाडी येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा.

आनंदवाडी येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा.

वेंगुर्ला.

    भीमा कोरेगाव येथे दोनशे सहा वर्षांपूर्वी घडलेल्या शौर्य दिनाच्या स्मृतीला अभिवादनाचा कार्यक्रम वेंगुर्ला आनंदवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा वेंगुर्ला तालुका, दलित सेवा मंडळ, व सावित्रीबाई महिला मंडळ वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.
  सुरुवातीला दलित सेवा मंडळ अध्यक्ष सुहास जाधव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सावित्रीबाई महिला मंडळ अध्यक्ष सुहानी जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
   याप्रसंगी आयु. वाय.जी. कदम व अमोल जाधव यांनी शौर्य दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले.यावेळी भीमा कोरेगाव दिनाचे महत्त्व सांगताना असे म्हणाले की,दोनशे सहा वर्षांपूर्वी जी भीमा कोरेगाव लढाई झाली ती केवळ ब्रिटिश व २८ हजार सैनिकात न होता माणसाला हक्क नाकारणाऱ्या मनुवादी प्रवृत्ती विरुद्ध होती, सामाजिक न्यायासाठी होती.ज्या ५०० वीर सैनिकांनी लढाई करून मनुवादी प्रवृत्तीचा बिमोड करून समता प्रस्थापित करण्याची सुरुवात केली. त्यामुळे आंबेडकरी जनतेला भीमा कोरेगावची लढाई ही प्रेरणास्थान आहे असे मान्यवरांनी विचार मांडले.
   या कार्यक्रमाला गजानन जाधव, रितेश जाधव, वाय.जी कदम, सुहास जाधव तसेच सावित्रीबाई महिला मंडळ पदाधिकारी, सभासद व धम्म बांधव- भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु.अमोल जाधव यांनी केले. तर उपस्थित सर्वांचे आभार सुहानी जाधव यांनी मानले.