वेंगुर्ला येथे ८४.५७ टक्के मतदान. कोकण पदवीधर मतदार संघ निवडणुक.

वेंगुर्ला येथे ८४.५७ टक्के मतदान.  कोकण पदवीधर मतदार संघ निवडणुक.

वेंगुर्ला
 
   कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु होते. तालुक्यात एकूण सरासरी ८४.५७ टक्के मतदान झाले. यामध्ये १६५९ पैकी १४०३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी वेंगुर्ला तहसील कार्यालय येथे दोन केंद्र तर शिरोडा येथे एक अशी ३ मतदान केंद्र तालुक्यात होती.मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
  महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्यात थेट लढत होत आहे यांच्यासह १३ उमेदवार रिंगणात होते.आज सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.