डांगमोडे, कोईल येथे कालावल खाडी किनारी उभारण्यात आलेले १२ अनधिकृत वाळू रॅम्प जमीनदोस्त.

डांगमोडे, कोईल येथे कालावल खाडी किनारी उभारण्यात आलेले १२ अनधिकृत वाळू रॅम्प जमीनदोस्त.

मालवण.
 
  तालुक्यातील डांगमोडे, कोईल येथे कालावल खाडी किनारी उभारण्यात आलेले १२ अनधिकृत वाळू रॅम्प महसूल पथकाने जमीनदोस्त केले.
  तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकातील मसुरे मंडळ अधिकारी, त्रिंबक तलाठी, त्रिंबक कोतवाल, मर्डे पोलीस पाटील तसेच मसुरे दूरक्षेत्र पोलीस कर्मचारी यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे महसूल प्रशासनाने स्पष्ट केले.