बेजबाबदार विधान करून माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अतुल काळसेकर यांची नार्को टेस्ट करा. मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांची मागणी.

बेजबाबदार विधान करून माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अतुल काळसेकर यांची नार्को टेस्ट करा.  मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांची मागणी.

सावंतवाडी.

   महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची दुदैवी घटना घडलेली असताना या घटनेच राजकारण करणाऱ्या व हि घटना संशयास्पद आहे या मागे जातीय दंगल घडवण्याचा विरोधकांचा कट आहे या मागे युती सरकारला बदनाम करण्याचा कट आहे अशी बेजबाबदार विधाने करणाऱ्या भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची तात्काळ नार्को टेस्ट करण्यात यावी म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे असलेली माहिती खरी आहे.कि अतुल काळसेकर खर बोलताहेत हे जनतेला कळेल.अतुल काळसेकर यांनी केलेल्या या विधानांची पोलीस यंत्रणेने देखील तात्काळ चौकशी करून खातरजमा करावी अवघ्या महाराष्ट्राच दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा केवळ वर्षभरापूर्वी उभा केलेला पुतळा पडण्याची दुर्दवी व मान खाली घालायला लावणारी घटना घडून देखील जनतेने संयम पाळला आहॆ. मात्र सत्ताधारी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या अतुल काळसेकर यांच्या कडे काहि तरी वेगळी गोपनीय माहिती असेल तर त्याची पोलीस यंत्रणेने स्वतंत्र चौकशी करावी तसेच हि माहिती शिवप्रेमी व  जनतेसाठी देखील उघड करावी अन्यथा अशी बेजबाबदार विधाने करणाऱ्या अतुल काळसेकर यांच्यावरच माथी भडकवणारी विधाने केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसे तर्फे जिल्हाध्यक्ष अँड.अनिल केसरकर यांनी केली आहे.