ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा संपन्न.

ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा संपन्न.

सिंधुदुर्ग.

     सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी अजिंक्य देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ओरोस येथे पार पडली.या सभेत बुथ लेवल एजंट नियुक्त करण्याच्या कामा संदर्भात आढावा घेण्यात आला. ज्या ग्राम कमिट्या तसेच मंडल कमिट्या झालेल्या नाहीत त्या लवकरात लवकर कराव्यात अशी सुचना अजिंक्य देसाई यांनी केली. ओबीसी विभागामार्फत काढण्यात येणाऱ्या जनजागरण यात्रे संदर्भात चर्चा करण्यात आली. तेलंगाणा राज्यात काँग्रेसची सत्ता आल्या बद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
    यावेळी बोलताना अजिंक्य देसाई यांनी सांगीतले की आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशात इंडिया आघाडीचीच सत्ता येईल आणि काँग्रेस पक्ष हा मोठा आणि महत्वाचा इंडिया आघाडीतील घटक पक्ष असेल म्हणून आपण जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि प्रेमाचा संदेश देऊन देशाला जोडण्यासाठी आणि एकसंघ ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या राहुल गांधी यांचे हात मजबूत करावेत असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
     यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष साईनाथ चव्हाण, विकासभाई सावंत, उपाध्यक्ष नागेश मोर्ये,उदय फणसेकर,विजय प्रभू, सरचिटणीस चंद्रशेखर जोशी,प्रवीण वरुणकर, प्रदेश प्रतिनिधी सुगंधा साटम, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, ओबीसी अध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर, देवगड तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, वैभववाडी तालुकाध्यक्ष दादामिया पाटणकर, जिल्हा सचिव रविंद्र म्हापसेकर, आनंद परूळेकर,स्मिता वागळे, कृष्णा धाऊसकर, अमोल सावंत, विभावरी सुकी, जिल्हा बॅंक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर, माजी नगराध्यक्षा आफ्रिन करोल, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष केतनकुमार गावडे,आयशा सय्यद, भालचंद्र जाधव, संदेश कोयंडे,महेंद्र मांजरेकर, सुरेंद्र चिपकर,संतोष चिपकर,चंदन पांगे,उपसरपंच रूपेश राणे,जेम्स फर्नांडिस, अनिकेत दहिबावकर, श्रेयस माणगावकर, विजय खाडे,सुंदरवल्ली स्वामी, सरदार ताजर, प्रमोद अणावकर, तिमाजी राऊळ, सत्यवान तेंडोलकर, दिगंबर मुणनकर, विशाल पारकर, नारायण प्रभू इत्यादी उपस्थित होते.