मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर.

सिंधुदुर्ग. 

   भारतीय नौसेनेच्यावतीने या वर्षीचा नौसेना दिवस सिंधुदुर्ग किल्ला येथे भव्यदिव्य स्वरूपात 4 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या  उपस्थितीत होणाऱ्या समारंभाच्या पूर्वतयारी पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. उद्या दुपारी 3 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व मोटारीने राजकोटकडे प्रयाण.दुपारी 3.30 वाजता नौसेना दिनानिमित्त आयोजित समारंभाबाबत पूर्वतयारी पाहणी. सायंकाळी 4 वाजता मोटारीने चिपी विमानतळ सिंधुदुर्गकडे प्रयाण. सायं. 4.30 वाजता चीपी येथे नौसेना दिनानिमित्त आयोजित समारंभाबाबत पूर्वतयारीबाबत बैठक. सायं. 5.15 वाजता चिपी विमानतळ येथून शासकीय  विमानाने मुंबईकडे प्रयाण.