परुळे येथील तराळी धनगरवाडी नळ पाणी योजना व स्ट्रीट लाईटचे माजी सभापती निलेश सामंत यांच्या हस्ते उद्घाटन.

परुळे येथील तराळी धनगरवाडी नळ पाणी योजना व स्ट्रीट लाईटचे माजी सभापती निलेश सामंत यांच्या हस्ते उद्घाटन.

वेंगुर्ला.

   आज दि १० रोजी परुळे तराळी धनगरवाडी येथील नळ पाणी योजना वं स्ट्रीट लाईटचे उद्घाटन माजी सभापती  निलेश सामंत यांच्या नेतृत्वाखाली झाले.गेली कित्येक वर्षे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागायचा ही योजना पूर्ण व्हावी म्हणून भाजप युवा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर यांनी स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन वेगवेगळ्या मार्गानी खूप प्रयत्न केले आंदोलन पण केली.यां कामासाठी माजी सरपंच श्वेता चव्हाण, सुनील चव्हाण यांनी खूप मोलाचे सहकार्य केले.
   या उद्घाटनवेळी माजी सभापती निलेश सामंत माजी सरपंच प्रदीप प्रभु, प्रसाद पाटकर, शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे, ग्रा.सदस्या प्राजक्ता पाटकर, सीमा सावंत, नमिता परुळेकर, दीपा दाभोलकर, सुभाष दाभोलकर, विजय परब, नंदू प्रभू, बाबा कोकरे, पुरुषोत्तम करलकर, धीरज आंबडपालकर, ठेकेदार किशोर परब, मयु वाडयेकर यांसह बहूसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. नळ पाणी योजना आणि स्ट्रीट लाईट च्या कामाबद्दल ग्रामस्थांनी खूप समाधान व्यक्त केले.