खर्डेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे युवा महोत्सवात उज्वल यश.

वेंगुर्ला.
मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणारा सांस्कृतिक युवा महोत्सव आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी येथे संपन्न झाला. या युवा महोत्सवात खर्डेकर महाविद्यालयाची कु. फाल्गुनी अजित नार्वेकर या विद्यार्थीनीने भरतनाट्यम या कला प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला तर हर्षल मेस्त्री या विद्यार्थ्याने हार्मोनियम वादनामध्ये तसेच भावगीत गायन स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला. या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आनंद बांदेकर यांनी पुष्पगुच्छ गुच्छ देऊन केले. सांस्कृतिक समितीचे चेअरमन प्रा. वामन गावडे, प्रा. विवेक चव्हाण, संख्या प्रतिनिधी श्री सुरेंद्र चव्हाण, प्रा. गायकवाड आदि उपस्थित होते.
या युवा महोत्सवात कु. विधी नाईक, सानिया राठकर, कल्पेश तिल कारेकर, गोपाळ सावंत हे विद्यार्थी सहभागी झाले होते. यशस्वी विद्यार्थ्याचे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. जयकुमार देसाई, संस्थेच्या चेअरमन मा. डॉ मंजिरी मोरे-देसाई, पेट्रन कौन्सिल सदस्य मा. दौलतराव देसाई आणि सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.