पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत कुशेवाडा-रावदस येथे वेदर स्टेशनची उभारणी. शेतकरी व बागायतदारांकडून समाधान व्यक्त.
वेंगुर्ला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत कुशेवाडा महसुली गाव रावदस हद्दीमध्ये तापमान व पर्जन्यमान मोजण्याचे वेदर स्टेशन उपकरण बसविण्यात आल्याने या परिसरातील शेतकरी व बागायतदार यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे.
म्हापण मंडल परिक्षेत्रातील शेतकऱ्यांची हे वेदर स्टेशन व्हावे यासाठी अनेक दिवसा पासून मागणी होती.सदर मागणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ पूर्ण करून ग्रामपंचायत कुशेवाडा-रावदस येथे हे वेदर स्टेशन उभारण्यात आले.
त्याबद्दल म्हापण मंडलातील सर्व शेतकरी, विकास सोसायटी चेअरमन व सर्व सरपंच यांच्यावतीने आज माजी सभापती निलेश सामंत, कशेवाडा सरपंच निलेश सामंत, ग्रां.प.सदस्य प्रदीप प्रभू, शंकर राठीवडेकर यांनी पालकमंत्री यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित होते.