देवगड येथील पाटगाव सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश

कणकवली
देवगड युथ फोरमचे अध्यक्ष आणि देवगडमधील युवा विधी तज्ञ ॲड. सिद्धेश अविनाश माणगांवकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. या वेळी माजी आमदार अजित गोगटे उपस्थित होते. ॲड माणगांवकर यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून पाटगाव परिसरातील तसेच सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आणि युवकांचा यात मोठ्या प्रमाणावर सहभाग राहिला. यामध्ये विजय गुरव अध्यक्ष–पावनादेवी देवस्थान कमिटी, पाटगाव), माजी सरपंच श्रद्धा गुरव, दत्ताराम गुरव (विश्वस्त – पावनादेवी देवस्थान कमिटी,पाटगाव), प्रदीप गुरव (माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक-वेळगीवे शेती विकास संस्था), संदीप गुरव(उपसरपंच–पाटगाव), विकास गुरव(अध्यक्ष – गावठणवाडी,पाटगाव), मंगेश गुरव (सचिव-गावठणवाडी, पाटगाव) तसेच विकास तेली आणि विनय पराडकर यांचा सहभाग आहे तसेच पाटगाव येथील विजय लक्ष्मण गुरव, दत्ताराम रामचंद्र गुरव, श्रद्धा गुरव, प्रदीप गुरव, विकास गुरव, विजय गुरव, मनोहर गुरव, गोविंद गुरव, विजय गुरव, संतोष गुरव, लक्ष्मण गुरव, विश्वास गुरव, अनिल गुरव, विनोद गुरव, सुनील गुरव, अविनाश गुरव, नाथूळा गुरव, गणपत घमरे, नितीन गुरव, महेंद्र गुरव, अनंता गुरव, प्राची बाणे, दीपक बाणे, निलेशा बाणे, सुनीता गुरव, सुलोचना गुरव, मनीषा गुरव, रेखा गुरव, सुमती गुरव आणि स्वप्ना गुरव यांच्या सारख्या शेकडो लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अॅड. सिद्धेश माणगांवकर यांच्या प्रवेशामुळे फणसगाव परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून स्थानिक राजकारणात नवे वळण येणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.