असनिये येथील बीएसएनएल फोरजी टॉवरचे सरपंच रेश्मा सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन.

असनिये येथील बीएसएनएल फोरजी टॉवरचे सरपंच रेश्मा सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन.

सावंतवाडी.

  असनिये सारख्या दुर्गम डोंगराळ भागात कोणत्याही प्रकारचे मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. याच गोष्टीचा विचार करून गावच्या सरपंच सौ. रेश्मा सावंत यांनी वारंवार बीएसएनएल कडे पाठपुरावा केला आणि त्यांच्या या पाठपुराव्यामुळे आज असनिये गावात बीएसएनएलचा 4g टॉवर उभा राहणार आहे त्याचे भूमिपूजन सरपंच सौ रेशमा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले त्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे अनेक दिवसापासून रखडलेले काम आज पूर्णत्वास येत आहे याचं सर्व श्रेय युवा कार्यकर्ते शिवसेना शाखाप्रमुख राकेश सावंत यांना दिले जात आहे.
   यावेळी सरपंच सौ रेश्मा रमेश सावंत, लक्ष्मण सावंत, राकेश सावंत, भरत सावंत, संदेश कोलते, संभाजी कोलते, दिपक सावंत, आनंद सावंत, अनिल सावंत, प्रशांत ठीकर, शशीकांत सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.