परंधाम गुळदुवे मठात महिला पुरोहितांद्वारे तुलसी विवाह संपन्न. प्रशिक्षित महिला पुरोहितांद्वारे पौरोहित्य.

परंधाम गुळदुवे मठात महिला पुरोहितांद्वारे तुलसी विवाह संपन्न.  प्रशिक्षित महिला पुरोहितांद्वारे पौरोहित्य.

सावंतवाडी.

   मातृशक्तिद्वारे पौरोहित्य व्हावे ही दिव्य संकल्पना पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी समाजात सुरू केली. या संकल्पनेचा फायदा महिला नी खूप सुंदर पद्धतीने घेतला व  प्रशिक्षित महिलांनी पौरोहित्य करून मातृशक्ति धर्माचरण करण्यासाठी अग्रेसर आहेत हे दाखवून दिले आहे असे प्रतिपादन क्षेत्रिय प्रमुख उपाध्याय सुधाकरजी यांनी केले.
   श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने राजाधिराज सद्गुरु सदानंदाचार्य स्वामीजी समाधी स्थान, श्री क्षेत्र परंधाम गुळदुवे - सावंतवाडी महाराष्ट्र येथे प्रशिक्षित महिला पुरोहितांच्या पौरोहित्याखाली तुलसी विवाह सोहळा सुसंपन्न झाला.याप्रसंगी ते बोलत होते.
  पूज्य स्वामीजींच्या हर घर पुरोहित - स्वयं पुरोहित या दिव्य संकल्पनेतून गोवा, महाराष्ट्र तसेच कर्नाटकात हजारो प्रशिक्षित पुरोहित तयार झालेले आहेत. गेली अनेक वर्षांपासून गोवा राजभवन, श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठ, विविध महनीय मान्यवरांच्या घरोघरी तसेच गुरुपीठाच्या सर्व मठ, मंदिर व आश्रमात तुलसी विवाह सोहळा प्रशिक्षित पुरोहितांच्या पौरोहित्याखाली संपन्न होत असतो. दरवर्षी प्रमाणे परंधाम गुळदुवे मठात यजमान सौ. व श्री. मंदार कांता नाईक न्हावेली,मळेवाड जिल्हा परिषद मतदार संघ मनसे विभाग प्रमुख. यांच्या यजमानपदाखाली तुलसी विवाह सुसंपन्न झाला. 
या सोहळ्यास  क्षेत्रीय प्रमुख उपाध्याय सुधाकर उत्तुरकर व गुळदुवे मठसमिती, संत समाज गुळदुवे, मळेवाड चे पदाधिकारी व सर्व गुरुबंधू आदि उपस्थित होते.