उबाठा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी पुकारलेल्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा.

उबाठा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी पुकारलेल्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा.

कुडाळ.

    दोडामार्ग सासोली येथे घडलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी पुकारलेल्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे. आंदोलनात आपण सहभागी होणार आहोत, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिला आहे.
    बेकायदेशीर अकृषक सनदा तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या आंदोलनाला महाविकास आघाडीतील घटकपक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे त्यांनी सांगितले. याबाबत शेख यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, "सर्व सामान्य नागरीकांना साध्या घर बांधणीसाठी अकृषक दाखला मिळण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो, परंतू या धनदांडग्यांना झटक्यात बेकायदेशीर अकृषक दाखले सुद्धा मिळतात. तरी सासोली ग्रामस्थांच्या न्याय मागणी नुसार बेकायदेशीर दिलेले अकृषक सनदा रद्द करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा २४ सप्टेंबरला होणाऱ्या आंदोलनाला काँग्रेसचा सक्रिय पाठिंबा राहिल".