वेंगुर्ला येथे २८ ऑक्टोंबर रोजी 'चांदणझुला' कोजागिरी कविसंमेलन.

वेंगुर्ला.
आनंदयात्री वाङमय मंडळ वेंगुर्ला यांचे 'चांदणझुला' हे कोजागिरी कविसंमेलन शनिवार दि. २८ ऑक्टोंबर रोजी दुपारी 3 वाजता साईमंगल कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे. या कविसंमेलनाचे उदघाटन सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व निवृत्त प्राध्यापक सुभाष गोवेकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. तसेच चांदणझुला कविसंमेलन ह.भ.प.अवधूत नाईक यांच्या अध्यक्षतेखालील होईल.
आनंदयात्री वाङमय मंडळ वेंगुर्ल्यात साहित्यविषयक विविध उपक्रम राबवित असते. वेंगुर्ले तालुक्यातील नवोदित कविता व्यासपीठ मिळावे या उद्देशाने मंडळाने हे कविसंमेलन आयोजित केले आहे. आपले बंधू भगिनी काव्यातून कशाप्रकारे आपल्या भावना, विचार व्यक्त करीत आहेत हे पहाण्यासाठी, त्यांचे कौतुक करण्यासाठी व नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी साहित्यप्रेमींची उपस्थिती आवश्यक आहे. तसेच या कविसंमेलनात शिरोडकर येथील कवी स्वप्नील वेंगुर्लेकर व दाभोली येथील कवयित्री प्रितम ओगले यांचे काव्यवाचनाचे विशेष कार्यक्रम होणार आहेत. म्हणूनच वेंगुर्ले तालुक्यासह जिल्हयातील साहित्य प्रेमींनी उपस्थित राहून काव्यानंद घ्यावा असे आवाहन आनंदयात्री वाङमय मंडळाने केले आहे.