सिंधुदुर्ग जिल्हा हौशी व सावंतवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय ४५+ क्रिकेट स्पर्धा

सिंधुदुर्ग जिल्हा हौशी व सावंतवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय ४५+ क्रिकेट स्पर्धा

 

बांदा


   सिंधुदर्ग जिल्हा हौशी क्रकेट असोसिएशन अंतर्गत २०२६ मधील ४५+ यजमान पदाची जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा दि.२८ मार्च व २९ मार्च २०२६ रोजी बांदा येथील पाटेश्वर मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन प्रमोद कामत जि. प. अध्यक्ष व अनिल हळदिवे (सिंधुदर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन, अध्यक्ष) यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ  विशाल परब (भाजपा युवानेते), ॲड. अनिल निरवडेकर (उपनगराध्यक्ष, सावंतवाडी) यांच्या हस्ते होणार आहे. तरी या स्पर्धेसाठी क्रिकेट प्रेमी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. डॉ. शरद शिरोडकर,अभय नाईक, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राणे, सचिव प्रशांत बांदेकर, खजिनदार राहुल रेगे जिल्हा सहसचिव यांनी केले आहे.