सिंधुदुर्ग जिल्हा कुणबी समाज उत्कर्ष मंडळाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत आम्रस्कर तर सचिवपदी विजय डोंगरे.

सिंधुदुर्ग जिल्हा कुणबी समाज उत्कर्ष मंडळाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत आम्रस्कर तर सचिवपदी विजय डोंगरे.

कणकवली.

     सिंधुदुर्ग जिल्हा कुणबी समाज उत्कर्ष मंडळाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत आम्रस्कर तर सचिवपदी विजय डोंगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.मंडळाची बैठक वैभववाडी येथील शैलेंद्र भोवड यांच्या निवासस्थानी विजय डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मंडळाची जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली.
   सदर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे, उपाध्यक्षपदी शिवाजी नाटेकर, उपसचिवपदी गजानन नामये, खजिनदारपदी दीपक पार्टे, सदस्यपदी - प्रकाश गावडे, दिनेश भिसे, म्हादये, प्रकाश बडमे, सदाशिव धावडे, वसंत नाटेकर, इंद्रजित परबते, भरत मांजलकर, जिल्हा प्रसारकपदी सुरेश पाळये, जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी अमित कुडतरकर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी वैभववाडी तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.सदर कार्यकारिणीपुढील प्रमाणे आहे. वैभववाडी कार्यकारणी अध्यक्ष - गणेश मधुसुदन फुटक ( बांधवाडी ),उपाध्यक्ष-प्रमोद प्रभाकर मांजलकर, सचिव विलास पाष्टे, सदस्य श्रीकांत डाफळे, संजय पाष्टे, सुर्यकांत डफळे, पुनाजी धुमक, दिपक नावळे, संजय ठकरूल, शैलेंद्र भोवड यांचा समावेश आहे.बैठकीला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.